विधिमंडळात आमदार नीट वागत नाही, कारवाई करा; राहुल नार्वेकरांचा थेट राज्यपालांना मेल?
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा ईमेल आयडी हॅक करण्यात आला आहे. दरम्यान, ईमेल आयडी हॅक करुन राज्यपालांना थेट मेल पाठवण्यात आला आहे. त्या मेलमध्ये विधिमंडळातील आमदारांवर कारवाई करण्याचे म्हटले आहे.
मुंबई, ५ मार्च २०२४ : विधिमंडळात आमदार नीट वागत नाही, त्यामुळे त्या आमदारांवर कारवाई करा, अशी मागणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मेलद्वारे राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे केली आहे. याप्रकरणी तपास केला असता असे समोर आले की, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा ईमेल आयडी हॅक करण्यात आला आहे. दरम्यान, ईमेल आयडी हॅक करुन राज्यपालांना थेट मेल पाठवण्यात आला आहे. त्या मेलमध्ये विधिमंडळातील आमदारांवर कारवाई करण्याचे म्हटले आहे. या हॅकींग प्रकारामुळे विधानसभा अध्यक्षांच्या सायबर सुरक्षेसंदर्भात प्रश्न निर्माण झाला आहे. तर याप्रकरणी आता मुंबईतील मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी दुपारी चार वाजता ईमेल हॅक झाल्याची बाब विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी या प्रकरणी मुंबईतील मरीन लाईन्स पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
Published on: Mar 05, 2024 03:28 PM
मी शिंदे गटात... ओमराजेंचा निर्णय बदलला? त्या एका विधानानं खळबळ
दुर्दैव! हायकोर्टात जाणार... निंबाळकर निकालावर ओमराजेंची प्रतिक्रिया
मोठी बातमी! आरोपींची निर्दोष मुक्तता, मात्र खोट्या साक्षीदारामुळे खटला
20 वर्षांनंतरचा निकाल! माफीचा साक्षीदार विश्वासार्ह नाही; सर्व आरोपी..
