विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा ईमेल हॅक, सरळ राज्यपालांना मेल करुन आमदारांवर कारवाईची मागणी

rahul narvekar email hacked: विधानसभा अध्यक्षांचा ईमेल आयडी हॅक करुन राज्यपालांना मेल पाठवण्यात आला आहे. त्या मेलमध्ये आमदारांवर कारवाई करण्याचे म्हटले आहे. या हॅकींग प्रकारमुळे विधानसभा अध्यक्षांच्या सायबर सुरक्षेसंदर्भात प्रश्न उपस्थित झाला आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा ईमेल हॅक, सरळ राज्यपालांना मेल करुन आमदारांवर कारवाईची मागणी
rahul narvekarImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Mar 05, 2024 | 1:10 PM

मुंबई | दि. 5 मार्च 2024 : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा ईमेल आयडी हॅक झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. ईमेल आयडी हॅक करुन राज्यपालांना मेल पाठवण्यात आला आहे. त्या मेलमध्ये आमदारांवर कारवाई करण्याचे म्हटले आहे. या हॅकींग प्रकारामुळे विधानसभा अध्यक्षांच्या सायबर सुरक्षेसंदर्भात प्रश्न उपस्थित झाला आहे. या प्रकरणी आता मुंबईतील मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा ईमेल आयडी हॅक करुन राज्यपाल राज्यपाल रमेश बैस  यांना मेल करण्यात आला. त्या मेलमध्ये आमदार सभागृहात नीट वागत नाही. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

पोलिसांकडून  आरोपीचा शोध सुरु

ईमेल हॅक झाल्याची बाब विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सोमवारी दुपारी चार वाजता लक्षात आली. त्यानंतर त्यांनी या प्रकरणी मुंबईतील मरीन लाईन्स पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. विधानसभा अध्यक्षांची सायबर सुरक्षा तोडणाऱ्यांचा शोध पोलीस घेत आहेत. त्याचवेळी विधिमंडळाची सायबर सुरक्षा अधिक चांगली करण्याचे काम प्रशासनाला करावे लागणार आहे.

सायबर सुरक्षेवर प्रश्न?

राहुल नार्वेकर यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी आहे. विधानसभेतील अनेक संवेदनशील बाबी त्यांच्याकडे आहेत. नुकतीच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा या प्रकरणाचा निकाल दिला होता. त्यापूर्वी शिवसेना कोणाची याचाही निकाल दिला होता. शिवसेना आमदार अपात्र प्रकरणात विधानसभा अध्यक्षांना मेल करण्यात आला होता. यामुळे त्यांचा मेल हॅक होण्याचा गंभीर प्रकार घडला आहे. या प्रकरणात आता पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. परंतु एकंदरीत विधिमंडळातील सायबर सुरक्षेसंदर्भात प्रश्न उपस्थित होत आहे.

हे सुद्धा वाचा

विधानसभा अध्यक्षांचा ईमेल आयडीचा वापर करुन राज्यपालांना मेल लिहिणारा व्यक्ती कोण आहे? त्याने हे धाडस का केले आहे? यासंदर्भात माहिती पोलिसांच्या तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.