Special Report | अब्दुल सत्तारांविना एकनाथ शिंदेंच्या सत्तेचा विस्तार?

योगायोग म्हणजे असा, जे सत्तार शिंदे-भाजप सरकारमध्ये मंत्रीपदाचे दावेदार मानले जात होते, सूत्रांच्या माहितीनुसार ज्यांनी मंत्रीपदासाठी एक दिल्लीवारी सुद्दा केली होती. त्याच सत्तारांचं नाव एका घोटाळ्याशी त्यादिवशी जोडलं गेलंय. जेव्हा बरोब्बर त्याच दिवशी मंत्रीमंडळ विस्तार होतोय. या योगायोगावरचा उपहास म्हणजे सत्तारांना आता शिक्षणमंत्रीच करण्याची मागणी विरोधक करु लागलेयत.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: वनिता कांबळे

Aug 08, 2022 | 11:42 PM

मुंबई : सत्ता स्थापनेनंतर शिंदे गटातून जे अब्दुल सत्तार(Abdul Sattar) सर्वात आनंदी दिसत होते, त्याच सत्तारांच्या मुलांचं नाव सध्या टीईटी परीक्षा घोटाळ्यात चर्चेत आलंय. योगायोग म्हणजे असा, जे सत्तार शिंदे-भाजप सरकारमध्ये मंत्रीपदाचे दावेदार मानले जात होते, सूत्रांच्या माहितीनुसार ज्यांनी मंत्रीपदासाठी एक दिल्लीवारी सुद्दा केली होती. त्याच सत्तारांचं नाव एका घोटाळ्याशी त्यादिवशी जोडलं गेलंय. जेव्हा बरोब्बर त्याच दिवशी मंत्रीमंडळ विस्तार होतोय. या योगायोगावरचा उपहास म्हणजे सत्तारांना आता शिक्षणमंत्रीच करण्याची मागणी विरोधक करु लागलेयत.

आता नेमक्या त्याच उमेदवार घोटाळ्याच्या रिपोर्टमध्ये अब्दुल सत्तारांच्या २ मुली आणि एका मुलाचं नाव समोर आल्याचा दावा केला जातोय.
एक नाव आहे हिना कौसर अब्दुल सत्तार शेख, दुसरं नाव आहे उजमा नाहिद अब्दुल सत्तार शेख, आणि मुलगा म्हणून नाव आहे मोहम्मद आमीर अब्दुल सत्तार. आता घोटाळेबाज उमेदवारांचा जो रिपोर्ट व्हायरल झालाय., त्यात सत्तारांच्या दोन मुली आणि एका मुलाचं नाव आहे.,
मात्र सत्तार म्हणतायत की त्यांचा मुलगा एलएलबी करतोय., मग तो टीईटी परीक्षेला बसूच कसा शकतो? आणि ज्या दोन मुलींनी टीईटी परीक्षा
दिली होती. त्या परीक्षेत नापास झाल्या होत्या., त्यामुळे त्यांचं नाव बोगस पद्धतीनं पास झालेल्यांच्या यादीत कसं काय आलं. हा सत्तारांना पडलेला प्रश्न आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें