Delhi Blast : दिल्लीत आज पुन्हा ब्लास्ट, धडडडाम आवाज ऐकताच महिलेच्या काळजाची धडधड, डायल केला 100 नंबर अन्… उडाला एकच गोंधळ
दिल्लीतील महिपालपूर परिसरात हॉटेल रेडिसनजवळ सकाळी स्फोटासारखा आवाज आल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी केलेल्या तपासानंतर स्पष्ट झाले की, हा आवाज डीटीसी बसचा टायर फुटल्यामुळे आला होता. एका महिलेने १०० नंबरवर फोन करून माहिती दिल्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले होते.
दिल्लीतील महिपालपूर परिसरातील हॉटेल रेडिसनजवळ सकाळी स्फोटाचा आवाज आल्याने खळबळ उडाली होती. मात्र, पोलिसांच्या तपासात ही केवळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, दिल्लीहून गुडगावला जाणाऱ्या एका डीटीसी बसचा टायर फुटल्याने हा मोठा आवाज झाला. एका महिलेने १०० नंबरवर फोन करून स्फोट झाल्याची माहिती दिल्यानंतर तातडीने पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र, बसचा टायर फुटल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. दरम्यान, दिल्लीत नुकताच झालेला स्फोट केंद्र सरकारने दहशतवादी हल्ला घोषित केला आहे. दोषींविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असे सरकारने म्हटले आहे. या घटनेचा अधिक तपास दिल्ली पोलिसांसह तपास यंत्रणांकडून सुरू आहे.

