अधिवेशनाचा कालावधी एक आठवड्याने वाढणार? अंबादास दानवे यांची नेमकी मागणी काय?
VIDEO | राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासंदर्भात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची परिषदेत मोठी मागणी
मुंबई : राज्यात सध्या पावसाळी अधिवेशन सुरू असून ते लवकरच ४ ऑगस्ट रोजी संपणार आहे. राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात होऊन गेल्या ७ दिवसांपासून कामकाज सुरू आहे. अशातच राज्यात अनेक प्रश्न प्रलंबित असल्याने विविध आमदारांमार्फत सभागृहात उपस्थित केले जात आहे. मात्र अधिवेशनाचा कालावधी कमी आणि कामकाज जास्त असल्याने कित्येकदा आमदारांना त्यांच्या प्रश्नांवर बोलता येत नाही तर कधी त्यांना बोलू दिले जात नाही. दरम्यान, सुरू असलेल्या या पावसाळी अधिवेशनाचा कालावधी एक आठवड्याने वाढवा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची विधान परिषदेत केल्याचे पाहायला मिळाले. तर अंबादास दानवे यांनी केलेल्या या मागणीनंतर विधीमंडळ कामकाज समितीसमोर तुमचे मुद्दे मांडा, असे उत्तर उपसभापती निलम गोऱ्हे यांनी दिलंय.
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
