Devendra Fadnavis Full Press conference | देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांना ओपन चॅलेंज, म्हणाले…

| Updated on: Apr 20, 2026 | 2:17 PM

लोकसभेत महिला आरक्षण विधेयक दोन-तृतीयांश बहुमत नसल्यामुळे पडले. धक्कादायक बाब म्हणजे नरेंद्र मोदी सरकारचे हे पहिले विधेयक ठरले जे मंजूर होऊ शकले नाही. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना खुलं चॅलेंज दिलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी डिमिलिटेशन आणि महिला आरक्षण विधेयकावर विरोधकांना थेट डिबेटचा चॅलेंज दिला आहे. यावर अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया देखील समोर आल्या आहेत. त्यांच्या या चॅलेंजला सुप्रिया सुळे यांनी स्वीकारलं आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या. ‘डिमिलिटेशन आणि महिला आरक्षणाचा संबध काय आहे? 543 मध्ये महिला आरक्षण द्या आम्ही त्याचा विरोध कधीच करणार नाही आहे. अनेक देशात सध्या अराजकता माजली आहे आणि त्यात तुम्ही हा विधेयक आणला आहे. महिला आरक्षणाला आमचा विरोध नाहीच आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत या विषयाच्या संदर्भात डिबेट करायला मी तयार आहे, त्यांनी जागा सांगावी आणि वेळ सांगावी.

Published on: Apr 20, 2026 02:17 PM
Follow Us