Sanjay Raut : शिंगं पुरलेली आहेत, म्हणून मुख्यमंत्री वर्षावर जायला घाबरतात; राऊतांचा दावा
संजय राऊत यांनी वर्षा बंगल्यावर पुरलेल्या शिंगांबद्दल आज पुन्हा एकदा पत्रकारांशी साधलेल्या संवादात भाष्य केलं आहे.
वर्षा बंगल्यावर पुरलेल्या रेड्याच्या शिंगांच्या भीतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिथे रहायला जात नसल्याचं खासदार संजय राऊत यांनी म्हंटलं आहे. आज फडणवीस ‘वर्षा’वर गेले व त्याआधी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून ‘वर्षा’ परिसरातील मोकळ्या जमिनीचे स्कॅनिंग करून घेतले. या शोध मोहिमेत तेथे पुरलेली रेड्यांची शिंगे मिळाली काय? हा पहिला प्रश्न व फडणवीस यांचे संपूर्ण समाधान झाले काय? हा दुसरा प्रश्न, असंही राऊत यांनी म्हंटलं आहे. आज सामनामध्ये त्यांनी याबाबत लेख लिहिला असून पत्रकारांशी संवाद साधतान देखील त्यांनी याबद्दल भाष्य केलं आहे. राऊतांच्या गुवाहाटी दौऱ्यात तिथल्या पुजाऱ्यांनी काय सांगितलं, यासंदर्भातील माहितीसुद्धा त्यांनी सांगितली.
यावेळी बोलताना राऊत यांनी सांगितलं की, शिंदे आणि त्यांच्याबरोबर शिवसेनेतून फुटलेल्यांच्या कर्मभूमीत म्हणजे गुवाहाटीच्या कामाख्या मंदिरात 15 दिवसांपूर्वी होतो. राज्याच्या मागच्या पक्षांतराच्या वेळी हे मंदिर आणि रेडाबळी प्रसिद्ध पावलं होतं. त्याची आठवण गाभाऱ्यातील पांडा म्हणजेच पुजारी लोकांनी माझ्याकडे काढली असल्याचं देखील राऊत म्हणाले.

VIDEO: आशाताईंचा आग्रह, CM गायले पण शेलारांचं गाणं ऐकून पोट धरून हसाल

अहमदाबाद दुर्घटनेनंतर DGCA ची मोठी अॅक्शन, एअर इंडियाला मोठा धक्का

एसटीच्या या बसमध्ये जागा राखीव असतानाही दिव्यांगांना No Entry, कारण...

ब्लॅक बॉक्सचा डेटा रिकव्हर भारतात शक्य नाही, अपघाताच कारण कसं समजणार?
