Sangli Crime | सांगली शहर परिसरात बनावट नोटा देऊन फसवणूक; नागरिक, व्यापारी हैराण

शहर परिसरात सध्या दोनशे आणि पाचशे रुपयांच्या बनावट नोटा चलनात आल्या आहेत. या नोटा किरकोळ व्यापाऱ्यांना देऊन त्याची फसवणूक केली जात आहे. नोटा खपविण्याचा फंडा गुन्हेगारांनी शोधला आहे.

सांगली : शहर परिसरात सध्या दोनशे आणि पाचशे रुपयांच्या बनावट नोटा चलनात आल्या आहेत. या नोटा किरकोळ व्यापाऱ्यांना देऊन त्याची फसवणूक केली जात आहे. नोटा खपविण्याचा फंडा गुन्हेगारांनी शोधला आहे. त्यामुळे याचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी सांगलीकर आणि व्यापारी करत आहेत.
सांगली शहरात किरकोळ खरेदी-विक्रीतून टोळीमार्फत या नोटा त्या खपविल्या जात आहेत. त्यामुळे किरकोळ विक्रेते, व्यापारी हैराण झाले आहेत. याचा फटका सर्वसामान्य व्यापाऱ्यांना बसत आहेत. या बनावट नोटा चलनात येत असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI