लाल वादळाला मुख्यमंत्री शिंदे यांनी सामोरं जावं, आंदोलकाची मागणी
याच्याआधी आम्ही लोकांच्या समोर तोंडावर पडलो आहोत. आता नाही याप्रश्नी स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समोर यावं
नाशिक : जगाचा पोशिंदा आपल्या हक्कासाठी काय करू शकतो हे चार वर्षांपुर्वी मुंबई आणि महाराष्ट्राने याच्या आधीही पाहिलं आहे. आता तेच चित्र महाराष्ट्रात पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा आवाजमुळे पहायला मिळत आहे. नाशिकमधुन निघालेलं लाल वादळ विधानभवनावर धडकणार आहे. नाशिकमधून हा लॉन्ग मार्च निघाला असून यावेळी माजी आमदार जिवा गावित यांनी आपली भूमिका मांडली. याच्याआधी आम्ही लोकांच्या समोर तोंडावर पडलो आहोत. आता नाही याप्रश्नी स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समोर यावं. आमचे, शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेऊन त्यावर तोडगा काढावा, शेतकऱ्यांना सामोरं जावं अशी मागणी गावित यांनी केली आहे. त्याचबरोबर आमच्या मागण्यांवर संबंधित सचिव, मंत्री यांनी समाधानकारक उत्तर दिल्यास ते आम्हाला मान्य असेल ही ते म्हणाले.

