Mumbai – Pune | मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मृत्यूचा थरार! कंटेनर-ट्रकची भीषण धडक, दोघांचा जागीच मृत्यू

Mumbai – Pune | मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मृत्यूचा थरार! कंटेनर-ट्रकची भीषण धडक, दोघांचा जागीच मृत्यू

| Updated on: Jun 01, 2026 | 10:41 AM

महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत भीषण अपघातांच्या घटनांनी चिंता वाढवली असून, मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर झालेल्या एका गंभीर अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एका 80 वर्षीय महिलेसह अन्य प्रवाशांना दुखापत झाली असून वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला. मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे सुमारे 4.30 वाजण्याच्या सुमारास खोपोली हद्दीत हा अपघात घडला.

महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत भीषण अपघातांच्या घटनांनी चिंता वाढवली असून, मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर झालेल्या एका गंभीर अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एका 80 वर्षीय महिलेसह अन्य प्रवाशांना दुखापत झाली असून वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला. मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे सुमारे 4.30 वाजण्याच्या सुमारास खोपोली हद्दीत हा अपघात घडला. पुण्याहून मुंबईकडे तेलाचे डबे घेऊन जाणारा एक कंटेनर भरधाव वेगात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि तो मुंबई मार्गिकेत उलटला.
याचवेळी मागून तांदूळ घेऊन जाणारा ट्रक घटनास्थळी पोहोचला. रस्त्यावर उलटलेल्या कंटेनरमुळे ट्रक चालकाला वाहनावर नियंत्रण ठेवता आले नाही आणि ट्रक थेट कंटेनरवर जाऊन आदळला. धडक इतकी भीषण होती की ट्रकमधील चालक आणि क्लिनर यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, या दोन अवजड वाहनांच्या अपघातात बाजूने प्रवास करणारी एक एर्टिगा कारही सापडली. कारमधील 80 वर्षीय वृद्ध महिला गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघातानंतर मुंबईकडे जाणारी वाहतूक सुमारे दोन तास ठप्प झाली होती. हायवे पोलीस, बचाव पथक आणि संबंधित यंत्रणांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. दुर्घटनाग्रस्त वाहने हटवल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.
या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून अपघाताचे नेमके कारण शोधले जात आहे.

Published on: Jun 01, 2026 10:41 AM
Follow Us