अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी जेजुरीत जाऊन घेतले खंडेरायाचे दर्शन
अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आपल्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी जेजुरीला जाऊन खंडेरायाचे दर्शन घेतले. त्यांनी खंडेरायाची विधिपूर्वक पूजा देखील केली.
पुणे : भाजपाच्या मिशन बारामती अभियानाला सुरुवात झाली आहे. या अभियानंतर्गत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन या बारामती दौऱ्यावर आहेत. त्यांचा या दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. त्यांनी आपल्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी जेजुरीला जाऊन खंडेरायाचे दर्शन घेतले. खंडेरायाची विधिपूर्वक पूजा केली. खंडेरायाच्या दर्शनानंतर त्या आज बारामतीला जाणार आहेत. भाजपाने आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्या या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. गुरुवारी अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी पुण्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधला तसेच बूथ अध्यक्षांची बैठक देखील घेतली. भाजपाच्या मिशन बारामतीवरून काही दिवसांपूर्वी चांगलेच आरोप-प्रत्यारोप झाल्याचं पहायला मिळालं. आता सीतारमन यांच्या बारामती दौऱ्याला सुरुवात झाली आहे.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

