AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कमला मिल परिसरातील टाईम्स टॉवरमध्ये अग्नितांडव, घटनास्थळावरुन tv9 मराठीचा आढावा, बघा सध्यस्थिती

कमला मिल परिसरातील टाईम्स टॉवरमध्ये अग्नितांडव, घटनास्थळावरुन tv9 मराठीचा आढावा, बघा सध्यस्थिती

| Updated on: Sep 06, 2024 | 12:18 PM
Share

गणेशोत्सव हा सण उद्यावर आला आहे. गणेशोत्सवाच्या या जल्लोषाच्या आणि उत्साहाच्या वातावरणात मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मुंबईच्या लोअर परळ येथे असणाऱ्या कमला मिल परिसरातील टाईम्स टॉव्हरमध्ये आग लागली आहे. बघा व्हिडीओ

मुंबईच्या लोअर परळ येथे असणाऱ्या कमला मिल परिसरातील टाईम्स टॉव्हरमध्ये भीषण आग लागली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. शुक्रवारी सकाळी 6.30 वाजता टाईम्स टॉव्हरला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच 3 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थाळी दाखल झाल्या होत्या, पण आग भीषण स्वरूपाची असल्यामुळे आणखी 3 अग्निशमन दलाच्या गाड्या अग्निशमन दलाकडून मागवण्यात आल्या होत्या. अशा एकूण 6 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात आणि भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. सुदैव म्हणजे टाईम्स टॉव्हर हे कमर्शियल टॉव्हर असल्यामुळे रात्री कोणतेही कर्मचारी याठिकाणी नव्हते म्हणून मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, ही भीषण आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. तर अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या भीषण आगीत कोणतीही जीवतहानी झालेली नाही. आग इतकी भीषण होती की, हे काचेचं टॉव्हर असल्यामुळे काचा आणि त्यातील काही सामान थेट खाली कोसळलं. या आगीत मोठी वित्त हानी झाल्याची माहिती सध्या मिळतेय.

Published on: Sep 06, 2024 12:18 PM