Sindhudurg | कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात कसा घडला?

Sindhudurg | कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात कसा घडला?

| Updated on: Apr 22, 2026 | 5:04 PM

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड समुद्रात पर्ससीन मासेमारी करणारी “अलमका” नावाची नौका बुडाल्याची घटना समोर आली आहे. वादळी वाऱ्याच्या तडाख्यात सापडल्यामुळे ही दुर्घटना घडली. मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून नौकेवरील सर्व 15 ते 20 खलाशी सुरक्षित बचावले आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड समुद्रात पर्ससीन मासेमारी करणारी “अलमका” नावाची नौका बुडाल्याची घटना समोर आली आहे. वादळी वाऱ्याच्या तडाख्यात सापडल्यामुळे ही दुर्घटना घडली. मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून नौकेवरील सर्व 15 ते 20 खलाशी सुरक्षित बचावले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ही नौका मच्छिमारी करून बंदराकडे परतत असताना मिठमुंबरी ते देवगड पवनक्कीसमोरील समुद्री पट्ट्यात वादळी वाऱ्यामुळे अडचणीत आली. वाढलेल्या वाऱ्याचा वेग आणि उंच लाटांमुळे नौकेचा तोल जाऊन ती समुद्रात बुडाली. संकटात सापडलेल्या खलाशांनी मदतीसाठी हाक दिल्यानंतर परिसरातील स्थानिक मच्छिमार तत्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तत्परतेने बचावकार्य राबवत सर्व खलाशांना सुरक्षित किनाऱ्यावर आणण्यात यश मिळवले. या घटनेत जीवितहानी टळली असली तरी नौका पूर्णपणे बुडाल्यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेमुळे स्थानिक मच्छिमारांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे, तर व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

 

 

Published on: Apr 22, 2026 05:04 PM
Follow Us