AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विमान हाताळणारे हात अनेकांनी बघीतले असतीलच आता लालपरीचं स्टेअरिंगही कोणाच्या हाती ते पहा...

विमान हाताळणारे हात अनेकांनी बघीतले असतीलच आता लालपरीचं स्टेअरिंगही कोणाच्या हाती ते पहा…

| Updated on: Jun 09, 2023 | 6:03 PM
Share

सावित्रीच्या अनेक लेकी अशा आहेत ज्या आपल्या चुल आणि मूलची जबाबदारी बघत विमान उडवतात. गगनात भरारी घेतात. तर रेल्वेही रूळावर आणतात. आता अशीच एक गगनभरारी म्हणा किंवा कौतुकास्पद कामगिरी म्हणा यशोगाथा म्हणा पण एका महिलेनं करून दाखवलं आहे.

नाशिक : आज पर्यंत महिलांनी चुल आणि मूल सांभाळावं असंच म्हटलं जात होतं. आणि तसं चित्र आजही समाजात पहायला ही मिळतं. तर सावित्रीच्या अनेक लेकी अशा आहेत ज्या आपल्या चुल आणि मूलची जबाबदारी बघत विमान उडवतात. गगनात भरारी घेतात. तर रेल्वेही रूळावर आणतात. आता अशीच एक गगनभरारी म्हणा किंवा कौतुकास्पद कामगिरी म्हणा यशोगाथा म्हणा पण एका महिलेनं करून दाखवलं आहे. आणि हे अभिमानाची बाब महाराष्ट्राच्या भूमितच सावित्रीच्या भूमितच घडली आहे. जी एसटी महामंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली. एसटी महामंडळाच्या इतिहासात आज पर्यंत एसटीचं स्टेअरिंग हे पुरूषांच्या हाती असायचं मात्र काल एक ऐतिहासिक घटना घडली आणि येथेही महिलांनी आपला ठसा उमठवला. नाशिक ते सिन्नर या मार्गावर प्रथमच एका महिला चालकाने एसटी महामंडळाची बस चालवली. माधवी साळवे या महिला चालकाने नाव तर तिने केलेली ही कामगिरी कौतुकास्पद आहे. एसटी महामंडळाने सन 2019 च्या भरती प्रक्रियेत 206 महिलांची चालक या पदावर निवड केली. या सर्व महिलांना एक वर्ष हेवी व्हेईकल चालवण्याचे ट्रेनिंग देण्यात आले. त्यानंतर या महिलांनी एक वर्ष एसटी बस चालवण्याचा सराव केला. आणि आता या महिलांना एसटी बसवर रितसर रूजू करून घेण्यात आले आहे. माधवी यांना लहानपणापासून गाड्या चालवण्याची आवड आहे. एसटी महामंडळात कुणीही महिला नसल्याने एसटीची निवड केल्याचे माधवी यांनी सांगितलं. तर नाशिक मधील धुडगाव येथे राहणाऱ्या माधवी यांचा गृहिणी ते बस ड्रायव्हर असा पहा हा कौतुकास्पद प्रवास

Published on: Jun 09, 2023 06:03 PM