रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? महिला मुख्यमंत्रिपदावर काय म्हणाल्या किशोरी पेडणेकर?
महाराष्ट्राला पहिल्या महिला मुख्यमंत्री कधी मिळणार या प्रश्नाची नेहमीच चर्चा होत असते. याच मुद्यावरून माजी महापौर किशोर पेडणेकर यांनी एक महत्वाचं विधान केलं आहे. राज्याला पहिल्या मुख्यमंत्री मिळणार का असा प्रश्न किशोरी पेडणेकर यांना विचारण्यात आला असात त्या काय म्हणाल्या?
राज्याला पहिल्या मुख्यमंत्री मिळणार का असा प्रश्न मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी स्पष्ट उत्तर दिलं. रश्मी ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही रस घेतला नाही. ते नेहमी त्यांच्या पतीच्या सोबत असतात. त्यामुळे त्या राजकारणात आहेत असं होत नाही, असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या. महिला मुख्यमंत्री व्हायला पाहिजे पण कारण नसताना रश्मी ठाकारे यांचं नाव घेणं योग्य नाही, असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले. राज्यात महिला मुख्यमंत्रिपदाच्या विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. किशोरी पेडणेकर आज नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना महिला मुख्यमंत्रिपदावर त्यांनी भाष्य केले आहे. दरम्यान, काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी माजी मिसेस मुख्यमंत्री रश्मी ठाकरे यांचं नाव मु्ख्यमंत्रिपदाच्या संभाव्य दावेदार म्हणून घेतलं. त्यावरून पेडणेकर यांनी वर्षा गायकवाड यांना सुनावल्याचे पाहायला मिळतंय.