‘सीनियर असल्यामुळे भाजपची ऑफर होती’, राष्ट्रवादी नेत्याचा मोठा खुलासा
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये प्रवेश केला आहे. तर त्यांच्यासोबत 40 एक आमदार गेले आहेत. त्यावरून सध्या अनेक चर्चांना उधान आला आहे.
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पडले आहेत. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये प्रवेश केला आहे. तर त्यांच्यासोबत 40 एक आमदार गेले आहेत. त्यावरून सध्या अनेक चर्चांना उधान आला आहे. याचदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांनी अनेक मोठे दावा केला आहे. याच्याआधी देखील त्यांनी असा दावा केला होता. त्यावेळी त्यांनी, भाजपमध्ये सामील होण्याची आणि महाविकास आघाडी सरकार पाडण्याची ऑफर आपल्याला होती. पण तसं केलं नाही आणि त्यांनी दोन वर्षांपूर्वी भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात जावं लागलं होतं. आता देखील त्यांनी त्याच्या पुनोरोच्चार करताना भाजपकडून ऑफर होती. पण मी गेलो नाही. इथेच आहे. तर सीनियर असल्यामुळेच ऑफर होती. तर आपण सीनियर असल्यामुळेच राष्ट्रवादीच राहणारच असल्याचे स्पष्ट केलं आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

