Vijay Shivtare | कौटुंबिक वादातून बदनामीचा प्रयत्न, विजय शिवतारेंच्या मुलीची भावनिक पोस्ट

माझ्या पित्याची माझ्याच भावांनी संपत्तीच्या लोभापायी केलेली दयनीय अवस्था पाहून आज मी अत्यंत अस्वस्थ आहे" असं ममता यांनी विजय शिवतारे यांच्या फेसबुक अकाऊण्टवरुन लिहिलं आहे.

शिवसेनेचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांची कन्या आणि आई-भाऊ यांच्यात वाद निर्माण झाल्याचं चित्र आहे. “माझ्या पित्याची माझ्याच भावांनी संपत्तीच्या लोभापायी केलेली दयनीय अवस्था पाहून आज मी अत्यंत अस्वस्थ आहे” असा आरोप विजय शिवतारे यांची कन्या आणि आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांच्या पत्नी ममता शिवतारे लांडे (Mamta Shivtare Lande) यांनी वडिलांच्या फेसबुक अकाऊण्टवरुन केला आहे. तर ममता यांचे आरोप त्यांच्याच मातोश्रींनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून खोडून काढले आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI