Vaishnavi Hagawane Case : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात आणखी एक मोठी अपडेट
Vaishnavi Hagawane Case Updates : राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी असलेल्या राजेंद्र हगवणे यांच्या सुनेने वैष्णवी हगवणेने आत्महत्या केली आहे. या प्रकरणी आता आणखी एक अपडेट समोर आली आहे.
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. वैष्णवी हगवणेचे वडील अनिल कसपटे यांनी पोलिसांमध्ये दिलेल्या तक्रारीत नमूद केलेली फॉरच्युनर कार आता बावधन पोलिसांकडून जप्त करण्यात आलेली आहे.
पुण्यातील वैष्णवी हगवणे हिने शशांक हगवणे याच्याशी प्रेमविवाह केलेला होता. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची ती सून आहे. या प्रेमविवाहाला घरच्यांचा विरोध असतानाही वैष्णवीने हे लग्न केलं होतं. असं असतानाही वैष्णवीच्या वडिलांनी मुलीच्या लग्नात कोट्यवधीचा हुंडा दिला होता. 51 तोळे सोनं, 7.5 कोळीचे चांदीचे भांडे आणि फॉरच्युनर कार हुंड्यात देण्यात आली होती. मात्र तरीही हुंड्यासाठी वैष्णवीचा छळ होत होता, असा आरोप कुटुंबाकडून करण्यात आला आहे. यासंपूर्ण प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. त्यानंतर आता बावधन पोलिसांनी कसपटे यांनी हुंड्यात दिलेली फॉरच्युनर कार जप्त केलेली आहे.

अजित पवार यांच्याकडून गावोगावी बूथ पाहणी

पहलगामच्या दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या 'त्या' दोघांना NIA कडून बेड्या

माळेगाव साखर कारखाना निवडणूक; अजित पवारांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न

कर्जमाफी अन लाडक्या बहिणींचे 2100 कधी मिळणार? राऊतांनी महायुतीला घेरलं
