पुण्यानंतर आता साताऱ्यातही कोयता गँगची पुन्हा दहशत; सेनॉर चौकात तोडफोड
येथे अनेक भागात गँगकडून दहशत माजवली जात असते. येथे गँगकडून अनेकदा नागरिकांच्या वाहनांची तोडफोड केली जात आहे. याचदरम्यान आता साताऱ्यात देखील कोयता गँग सक्रीय झाल्याचे समोर येत आहे.
सातारा : गेल्या काही वर्षात पुण्यात कोयता गँगची दहशत वाढली आहे. येथे अनेक भागात गँगकडून दहशत माजवली जात असते. येथे गँगकडून अनेकदा नागरिकांच्या वाहनांची तोडफोड केली जात आहे. याचदरम्यान आता साताऱ्यात देखील कोयता गँग सक्रीय झाल्याचे समोर येत आहे. येथील बसाप्पा पेठेतील सेनॉर चौकात कोयता गँगकडून तोडफोड करण्यात आली आहे. ज्यात एका चारचाकी गाडीचं नुसकान करण्यात आलं आहे. तर ही तोडफोड जुन्या वादातून करण्यात आल्याचं बोललं जात आहे. दरम्यान याची माहिती मिळताच सातारा शहर पोलिसांनी तिकडे धाव घेतल परिस्थिती हाताळली आहे. टुरिस्ट व्यावसायिक सौरभ पवार हे रात्र प्रवास करत असतानाच हा हल्ला त्यांच्या गाडीवर करण्यात आला. तर या हल्ल्यात कोणीही जखमी झाले नाही.
काय तो विजय... सगळं कसं ओक्के! शहाजीबापू पाटलांनी सांगोल्यात राखला गड
निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?
बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर

