AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nitin Gadkari |राष्ट्रीय महामार्गाच्या कामामध्ये शिवसेनेची दहशत, गडकरींचा मुख्यमंत्र्यांवर लेटरबॉम्ब

| Edited By: | Updated on: Aug 14, 2021 | 8:12 PM
Share

विविध प्रकारच्या नियमबाह्य मागण्यांनी अधिकारी आणि कंत्राटदार हैराण आहेत. मागण्या पूर्ण न केल्याने काम बंद पाडण्यापर्यंत मजल गेली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ठाकरे सरकारवर लेटर बॉम्ब टाकला आहे.

मुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. वाशिम जिल्ह्यातील रस्ते कामांना स्थानिक शिवसेना आमदार खासदारांकडून विरोध होतोय. गेल्या अनेक महिन्यांपासून काम रखडलंय. माहिती घेतल्यावर स्थानिक शिवसेना प्रतिनिधींनी ही काम थांबवली असल्याचं कळलं. शिवसेनेच्या दहशतीमुळे राज्यातील रस्त्यांची काम बंद करावी लागतील. असंच जर सुरू राहिलं तर महाराष्ट्रात रस्त्यांच्या कामांना नविन मंजुरी देण्याबाबत परत विचार करावा लागेल. विविध प्रकारच्या नियमबाह्य मागण्यांनी अधिकारी आणि कंत्राटदार हैराण आहेत. मागण्या पूर्ण न केल्याने काम बंद पाडण्यापर्यंत मजल गेली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ठाकरे सरकारवर लेटर बॉम्ब टाकला आहे.