Ganesh Chaturthi 2023 | मुंबईच्या बाप्पांचे दर्शन घेणार आहात? ‘असे’ कपडे घालून गेले तर… No Entry
VIDEO | गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांसोबत कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी अंधेरीचा राजा मंडळाकडून विशेष खबरदारी, गणेश भक्तांसाठी थेट ड्रेस कोडच केला जारी, बघा कोणत्या कपड्यांना परवानगी?
मुंबई, १७ सप्टेंबर २०२३ | लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी अवघे काही तासच शिल्लक राहिले आहेत. राज्यभरात गणेशभक्त आपल्या बाप्पाच्या तयारीसाठी एकच लगबग करताना दिसत आहेत. अशातच सार्वजनिक गणेश मंडळांनीही गणेश भक्तांच्या सुरक्षेची जबाबदारी घेतल्याचे पाहायला मिळत आहे. कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी ही खबरदारी घेतली जात आहे. त्यासाठी काही नियमावलीही तयार केली आहे. अंधेरीचा राजा मंडळानेही ड्रेस कोडबाबतचा एक नियम जारी केला आहे. या नियमानुसार, यंदा हाफ पँट आणि शॉर्ट स्कर्ट परिधान करून येणाऱ्या भाविकांना अंधेरीच्या राजाचे दर्शन घेता येणार नाही. ड्रेसकोडसाठी मंडपाच्या बाहेर आणि आत एक फलक लावण्यात आला आहे, ज्यावर कोणत्या प्रकारच्या ड्रेसला परवानगी आहे आणि कोणत्या प्रकारच्या ड्रेसला परवानगी नाही याचे बॅनरही लावण्यात आल्याचे पाहायला मिळत आहेत.
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..

