Ganesh Chaturthi 2023 | यंदा मुंबईतील सर्वात उंच बाप्पाची मूर्ती कोणती तुम्हाला माहितीये का?
VIDEO | यंदाच्या वर्षी चाळीस फुटाची म्हणजेच मुंबईतील सर्वात उंच मूर्ती म्हणून गिरगावच्या 11 व्या गल्लीतील मुंबईचा महाराजा विराजमान, बघा यंदा काय आहे या गणेशोत्सव मंडळाचं वैशिष्ट्य?
मुंबई, १९ सप्टेंबर २०२३ | मुंबई शहरातील गणेशोत्सव म्हटलं की डोळ्यासमोर भल्या मोठ्या गणपती बाप्पाच्या मूर्ती येतात. दरवर्षी मुंबईतील बाप्पा आणि मुंबईतील सार्वजनिक मंडळाची सजावट बघण्यासाठी भाविक गर्दी करत असतात. 1963 पासून सुरू झालेल्या गणेशोत्सवात प्रत्येक वर्षी मूर्तीची उंची वाढवत यंदाच्या वर्षी चाळीस फुटाची म्हणजेच मुंबईतील सर्वात उंच मूर्ती म्हणून गिरगाव येथील 11 व्या गल्लीतील मुंबईचा महाराजा विराजमान झालेला आहे. आज सकाळपासूनच भाविकांनी या ठिकाणी गर्दी करत गणरायाचे दर्शन घेतलेले आहे तर सर्वांनाच कुतूहल म्हणून या गणेशाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. यावर्षी इंद्रदेवाच्या स्वरूपात या गणरायाचे स्वरूप पाहायला मिळत आहे तर याच मंडपात राम मंदिराचा देखावा देखील साकारल्याचा पाहायला मिळत आहे.
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

