गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपीचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, धनुष्यबाण हाती घेताच प्रमुखपदी नियुक्ती

गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपीचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, धनुष्यबाण हाती घेताच प्रमुखपदी नियुक्ती

| Updated on: Oct 20, 2024 | 1:34 PM

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी असलेला श्रीकांत पांगारकर यांनी जालन्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. इतकंच नाहीतर त्याने निवडणूक लढवण्याची इच्छा देखील व्यक्त केली आहे.

गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपीने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याची बातमी समोर येत आहे. गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी जेलमधून परतताच श्रीकांत पांगारकर याने शिंदे गटात प्रवेश केला आहे. श्रीकांत पांगारकर याचा केवळ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशच नाहीतर त्याची जालना विधानसभा प्रमुखपदी नियुक्तीदेखील करण्यात आली आहे. जालना येथून श्रीकांत पांगारकर याने विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. श्रीकांत पांगारकर हा जालना नगर परिषदेचा नगरसेवक देखील होता. दरम्यान, गौरी लंकेश हत्या प्रकरणात कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्रातील यंत्रणांच्या मदतीने सुरू असलेल्या तपासात अनेकांना अटक करण्यात आली. 2001 ते 2006 दरम्यान श्रीकांत पांगारकर याला ऑगस्ट 2018 मध्ये अटक करण्यात आली होती. तर 4 सप्टेंबर रोजी श्रीकांत पांगारकर याला कर्नाटक उच्च न्यायालयाकडून गौरी लंकेश हत्या प्रकरणात जामीन मंजूर कऱण्यात आला आहे.

Published on: Oct 20, 2024 01:19 PM