Video | गौतमीचा नादच खुळा! ठसकेबाज डान्स पाहून पब्लिकही लागली नाचायला, एका स्टेपनं नं कार्यक्रम गाजवला!!

| Updated on: Jun 02, 2026 | 4:44 PM

सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात जुनी गाणी नव्याने चर्चेत येत आहेत. काही दिवसांपूर्वी गौतमी पाटील माधुरी दीक्षितच्या सुपरहिट गाण्यावर डान्स केला होता. तिचा हा डान्स सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला होता. त्यानंतर अशातच आता तिचा आणखी एक व्हिडीओ सध्या प्रचंड चर्चेत आला आहे. ती एका कार्यक्रमात धडकाबाज डान्स करताना दिसतेय.

या व्हिडीओमध्ये गौतमी पाटीलने गुलाबी रंगाचा ब्लाऊज आणि पांढऱ्या रंगाची साडी परिधान करून स्टेजवर धडाकेबाज डान्स केला आहे. साध्या पण आकर्षक लुकमध्ये तिने केलेल्या डान्सने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. साडीमध्येही तिचा आत्मविश्वास आणि मंचावरील डान्स पाहून चाहते देखील थक्क झाले आहेत.

गेल्या काही वर्षांत गौतमी पाटीलने आपल्या खास डान्स स्टाइलमुळे स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. पारंपरिक मराठी गाण्यांना आधुनिक टच देत ती सादर करत असलेल्या परफॉर्मन्समुळे तरुणाईमध्ये तिची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सध्या ‘पाटलांचा बैलगाडा’ या गाण्यावरचा तिचा हा डान्स सर्वत्र चर्चेत असून पुढे ती कोणत्या नव्या गाण्यावर थिरकणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

Published on: Jun 02, 2026 4:30 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us