EPFO : पीएफच्या पैशांतून नवं घर घेताय? EPFO च्या ‘या’ नव्या नियमामुळे आता नो टेन्शन, कारण यापुढे…
EPF Rules Changed तुम्ही आता तुमच्या PF खात्यातील जमा असलेल्या एकूण रकमेपैकी ९०% पर्यंत रक्कम घर खरेदीसाठी, घर बांधण्यासाठी किंवा गृहकर्जाचा (Home Loan) EMI भरण्यासाठी काढू शकणार आहात.
घर घेणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बाब आहे. कर्मचारी पीएफ खात्यातून ९० टक्के रक्कम काढू शकणार आहेत. ईपीओफओकडून पीए काढण्याच्या नियमात बदल करण्यात आला आहे. या नव्या नियमानुसार, पीएफ खात्यातून घर खरेदी करण्यासाठी ९० टक्क्यांपर्यंत रक्कम काढता येणार आहे. हे नवीन नियमांमुळे शक्य झाले आहे आणि पहिल्यांदा घर घेणाऱ्यांसाठी हा एक मोठा दिलासा आहे. इतकंच नाही तर या नव्या नियमांमुळे पीएफची रक्कम लवकर मिळण्यात मदत होणार आहे.
PF खात्यातील जमा असलेल्या एकूण रकमेपैकी ९० टक्के रक्कम घर खरेदीसाठी, घर बांधण्यासाठी किंवा गृहकर्जाचा हफ्ता भरण्यासाठी आता काढता येणार आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुमचे पीएफ खाते किमान ३ वर्षे जुने असणे आवश्यक आहे. तुम्ही खरेदी करत असलेले घर तुमच्या नावावर, तुमच्या जोडीदाराच्या (spouse) नावावर किंवा दोघांच्या एकत्रित नावावर असणे आवश्यक असणार आहे.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट

