Eknath Shinde : …त्यामुळे काहींना घरी जावं लागलंय… शिंदेंकडून आपल्याच आमदार अन् मंत्र्यांना वॉर्निंग
वादग्रस्त आमदार आणि मंत्र्यांवरून एकनाथ शिंदे यांनी बैठक घेत वॉर्निंग दिलीये. चुकीच्या गोष्टीवर एनर्जी वाया घालू नका. बदनामीमुळे काही मंत्र्यांना घरी जावं लागलेलं आहे, असा सूचक इशारा शिंदेंनी दिलाय.
गेल्या काही दिवसात वादात अडकलेले आमदार संजय गायकवाड आणि मंत्री संजय शिरसाटांवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी चांगली शाळा घेतली. बदनामीमुळे काहींना घरी जावं लागलेलं आहे असा सूचक इशारा शिंदेंनी आमदार आणि मंत्र्यांना दिलाय. ‘गेल्या काही दिवसात काही घटना घडल्या तुमच्याकडे दाखवलेलं बोट माझ्याकडे असतं. तुम्ही सर्वजण माझी माणसं आहात. आपलं कुटुंब एक आहे. बदनामीमुळे काही मंत्र्यांना घरी जावं लागलं आहे. तुमची बदनामी म्हणजे माझी बदनामी आहे. तुमचे आमदार काय करतात असा प्रश्न मला विचारला जातो. चुकीच्या गोष्टीवर एनर्जी वाया घालू नका’, असे शिंदे म्हणाले.
अधिवेशन सुरु होताच आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला बुक्क्यांनी मारहाण करत कहर केला. त्यानंतर मंत्री शिरसाट यांच्या पैशांच्या बॅगेसोबतचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामुळे गैरवर्तणुकीमुळे शिंदेंचे मंत्री आणि आमदार विरोधकांच्या टार्गेटवर आले. पण शिंदेनी समज दिल्यानंतर विधानभवनात आलेल्या शिरसाटांनी माध्यमांना कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा

