Shivsena : गायकवाड, शिरसाटांना शिंदेंची वॉर्निंग तर फडणवीसांची तंबी; म्हणाले डोक्यात हवा; तुमची बदनामी म्हणजे माझी..
शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट आणि आमदार संजय गायकवाड अडचणीत आल्याच्या चर्चा सुरू झाल्यात. संजय शिरसाट आणि संजय गायकवाड यांना शिंदेंनी झापलंय तर फडणवीसांनी सुनावल्याची माहिती आहे. संजय शिरसाट यांच्या पैशांच्या बॅगेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांना कानपिचक्या देण्यात आल्या तर कॅन्टीन मारहाण प्रकरणावरून गायकवाड यांना सुद्धा चांगलीच तंबी देण्यात आली आहे.
मंत्री संजय शिरसाट यांच्या बेडरूम मधील पैशांची बॅग असलेला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आणि आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केल्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनीही खडसावलं आहे. शिंदेंनी दोन्ही नेत्यांना झापत वॉर्निंग दिली तर फडणवीसांनी शिरसाटांना तंबी दिली आहे.
गायकवाड आणि शिरसाटांना शिंदेंची वॉर्निंग
गेल्या काही दिवसात काही गोष्टी घडल्या. तुमच्याकडे दाखवलेलं बोट हे माझ्याकडे असतं. तुमचे आमदार काय करतात? असा प्रश्न मला विचारतात. तुमची बदनामी म्हणजे माझी बदनामी आहे. चुकीच्या गोष्टींवर एनर्जी वाया घालू नका. बदनामीमुळे काही मंत्र्यांना घरी जावे लागेल, असा शिंदेंचा इशारा आहे.
माझ्याच कुटुंबीयांवर कारवाईचा बडगा उगारायला मला अजिबात आवडणार नाही. कमी बोला जास्त काम करा, अशी सर्व मंत्र्यांना समज दिलीये. मी रागावत नाही मी प्रमुखासारखं वागत नाही कार्यकर्त्यासारखं वागतो तुम्ही तसंच वागा आपल्या डोक्यात हवा जाऊ देता कामा नये. कितीही पद मिळाली तरी कार्यकर्ता आहे, असं समजून काम करा. कमी वेळात जास्त यश मिळालेलं लोक आपल्या पाठीशी आहेत, त्यामुळे बदनामीचा डाव रचले जात आहेत. प्रत्येक गोष्टीची काळजी घ्या यापुढील काळ कसोटीचा आहे. सामाजिक जीवनात पथ्य पाळावी लागतात ती काळजी घ्या.
फडणवीस शिरसाटांना काय म्हणाले?
पैशांची बॅग असलेला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिरसाटांना फडणवीसांना सुनावलंय. मंत्री असताना असं वर्तन योग्य नाही, असं म्हणत फडणवीसांनी तंबी दिली.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन

