दुष्काळात मेंढपाळांनाही मदत द्या; पडळकरांची मागणी, धनगर आरक्षणावर मोठं विधान!
आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारने शेतकऱ्यांप्रमाणेच मेंढपाळ, वडार आणि कैकाडी समाजासाठीही दुष्काळ जाहीर करून त्यांना मदत करावी, अशी मागणी केली आहे. बिरोबाच्या बनातून बोलताना पडळकर म्हणाले की, ज्यांच्या नावावर जमीन नाही आणि ज्यांचा सात-बारा नसतो, अशा मेंढपाळांना आणि जनावरे पाळणाऱ्या समाजाला दुष्काळामुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यांच्या जनावरांसाठी चारा आणि पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे. त्यामुळे सरकारने त्यांच्याही खात्यात थेट मदत जमा करावी, असे आवाहन त्यांनी केले.
आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारने शेतकऱ्यांप्रमाणेच मेंढपाळ, वडार आणि कैकाडी समाजासाठीही दुष्काळ जाहीर करून त्यांना मदत करावी, अशी मागणी केली आहे. बिरोबाच्या बनातून बोलताना पडळकर म्हणाले की, ज्यांच्या नावावर जमीन नाही आणि ज्यांचा सात-बारा नसतो, अशा मेंढपाळांना आणि जनावरे पाळणाऱ्या समाजाला दुष्काळामुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यांच्या जनावरांसाठी चारा आणि पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे. त्यामुळे सरकारने त्यांच्याही खात्यात थेट मदत जमा करावी, असे आवाहन त्यांनी केले. पडळकर यांनी यावेळी धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरही प्रकाश टाकला.
२ नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात धनगर आरक्षणाच्या संदर्भात सुनावणी अपेक्षित आहे. राज्य सरकारने या प्रकरणात सकारात्मक भूमिका मांडावी, अशी मागणी त्यांनी केली. सर्वोच्च न्यायालयात धनगर समाजाच्या बाजूने निकाल लागण्याची अपेक्षा असून, जर काही अडचणी आल्या, तर प्लॅन बी तयार ठेवण्यासाठी १५ नोव्हेंबर रोजी पुण्यात तज्ज्ञ धनगर समाजाची बैठक आयोजित करण्यात आली आहे, अशी माहितीही पडळकर यांनी दिली.
