घराणेशाहीला डावलत मोदींनी शिंदेना मुख्यमंत्री केलं, म्हणून पवार-काका पुतण्यांच्या पोटात दुखतंय- गोपीचंद पडळकर
गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी पुन्हा एकदा शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.घराणेशाहीला डावलत मोदींनी शिंदेना मुख्यमंत्री केलं, म्हणून पवार-काका पुतण्यांच्या पोटात दुखतंय, असं पडळकर म्हणाले आहेत. “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी कुठल्याही घराणेशाहीला संधी न देता, एका साध्या मराठा कुटुंबातील एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची संधी दिली. म्हणून यांच्या पोटात कळा उठतायेत आणि म्हणूनच ते आता इकडे तिकडे बोंबा मारत फिरतायेत, असं पडकर म्हणाले आहेत. गरीब मराठा समाजाचं भलं करण्यापेक्षा यांना आपल्याच पै पाव्हण्यांचं भलं करायचंय.हीच यांची खरी वृत्ती बाकी सगळ्या आपुलकीच्या भूलथापा. मराठा समाजाला पूर्वलक्ष्यी प्रभावाने ews चा लाभ देण्याचा ठाकरे – पवार सरकारमधील निर्णय उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. मी त्याच वेळेस सांगत होतो की कायद्यामध्ये पूर्वलक्ष्यी प्रभावाने काही देता येत नाही. आता पुन्हा एकदा सिद्ध झाले की, काका-पुतण्यांना गरीब मराठा समाजाचं भलं होऊ द्यायचं नाहीये, असं गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत.
Published on: Jul 30, 2022 02:45 PM
पुन्हा 'मविआ'मध्ये मिठाचा खडा पडणार? शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील
Latest Rain Update | प्रवाशांनो काळजी घ्या! मुंबई लोकल मंदावली; थेट
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
