विकासाचं बघा, नावांमध्ये अडकू नका -Aslam Shaikh

ज्या भाजप नेत्यांनी रस्त्यांना वीर टिपू सुलतान नाव दिलं, त्या भाजप नेत्यांचा फडणवीस राजीनामा घेणार का? असा सवाल अस्लम शेख यांनी फडणवीसांना विचारला आहे. आता भाजपच्या पोटात अचानक का दुखू लागले? असाही सवाल त्यांनी विचारला आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jan 26, 2022 | 7:00 PM

मुंबई : मुंबईच्या राजकारणात सध्या एकच नाव गाजतंय ते म्हणजे टिपू सुलतान. (Tipu Sultan) मालडमधील एका क्रिडा संकुलाच्या नावावरून हा सारा वाद पेटलाय. या नावाला भाजपसह (Bjp) बजरंग दलाने जोरदार विरोध केला. यावेळी भाजप कार्यकर्ते आणि बंजरंग दलाच्या (Bajrang Dal) कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली आहे. याच्या उद्घाटनानंतर अस्लम शेख यांनी मीडियाला प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर जोरदार पलटवार केलाय. भाजपने रस्त्यांना टिपू सुलतान नाव दिलं, आता भाजप केवळ निवडणुका आल्यात म्हणून राजकारण करत आहे. ज्या भाजप नेत्यांनी रस्त्यांना वीर टिपू सुलतान नाव दिलं, त्या भाजप नेत्यांचा फडणवीस राजीनामा घेणार का? असा सवाल अस्लम शेख यांनी फडणवीसांना विचारला आहे. आता भाजपच्या पोटात अचानक का दुखू लागले? असाही सवाल त्यांनी विचारला आहे. गेल्या दोन दिवसांपासून या नावावरून जोरदार पॉलिटिकल राडा सुरू आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें