Guillain-Barre Syndrome : पुण्यात दुर्मीळ आजाराची एन्ट्री; दरवर्षी १ लाखांत एकच व्यक्ती बाधित, ‘ही’ लक्षणं दिसताच…
पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमचे २२ संशयित रूग्ण आढळून आले आहेत. या सर्व २२ संशयित रूग्णांचे नमुने ICMR-NIV कडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.या आजाराचे नेमके कारण काय ते सध्या समोर आलेले नाही.
पुण्यात एका दुर्मीळ आजाराने एन्ट्री केल्याची मोठी बातमी समोर येत आहे. यामुळे पुणेकरांची चिंता वाढली आहे. पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमचे २२ संशयित रूग्ण आढळून आले आहेत. या सर्व २२ संशयित रूग्णांचे नमुने ICMR-NIV कडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तेथे नमुन्यांची तपासणी केल्यानंतर या आजाराचा निष्कर्ष निघेल. दरम्यान, पुणे महापालिकेकडून या २२ संशयित रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि पूना हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात काही रुग्णांना दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शहरातील या दुर्मिळ विकाराच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी पुणे पालिकेतर्फे बाधित भागात एक टीम पाठवण्यात येणार असल्याचेही सांगितले जात आहे. गुइलेन बॅरे सिंड्रोम हा एक दुर्मिळ आजार आहे. दरवर्षी १ लाख लोकांमध्ये तो एका व्यक्तीला होतो. याचे निदान गुंतागुंतीचे असते. चेतासंस्थेच्या चाचण्या आणि स्पायनल फ्लुइड चाचण्या या आजाराच्या निदानासाठी आवश्यक असतात. आयव्हीआयजी अथवा प्लाझ्मा एक्स्चेंजसारख्या उपचारांमुळे रुग्णाला लवकरात लवकर मदत मिळू शकते. गुइलेन बॅरे सिंड्रोम या आजाराचे पहिले लक्षण म्हणजे अशक्तपणा आणि हातपायांना मुंग्या येणे. या आजाराचे नेमके कारण काय ते सध्या समोर आलेले नाही.

'ता उम्र गालिब हम यही भूल करते रहे... फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा

Delhi Election Result : दिल्लीतील पराभवानंतर काय म्हणाले अरविंद केजरीव

EVM वर बोलणारी तीन माकडं आज गायब - नितेश राणेंचा हल्लाबोल

संजय राऊत म्हणजे बडबड बहाद्दर - गिरीश महाजनांनी घेतला समाचार
