Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिंदेंच्या शिवसेनेत उदय सामंतांच्या माध्यमातून पडणार फूट? वडेट्टीवारांचं भाकित अन् राऊतांकडून राजकीय भूकंपाचे संकेत?

शिंदेंच्या शिवसेनेत उदय सामंतांच्या माध्यमातून पडणार फूट? वडेट्टीवारांचं भाकित अन् राऊतांकडून राजकीय भूकंपाचे संकेत?

| Updated on: Jan 21, 2025 | 10:10 AM

काँग्रेसचे वडेट्टीवार आणि संजय राऊतांनी शिंदे यांच्या शिवसेनेत एक नवा उदय होणार असल्याचा दावा केलाय. उदय सामंतांकडे 20 आमदार असल्याचे सांगून राऊतांनी खळबळ उडवली. मात्र दरेगावी गेलेल्या एकनाथ शिंदेनी पालकमंत्री पदावरून वक्तव्य करून लक्ष वेधलं. नाराज झालेल्या भरत गोगावले यांचे एकनाथ शिंदे यांनी समर्थन केले.

सकाळी सकाळीच वडेट्टीवार आणि राऊतांनी शिंदे यांच्या शिवसेनेच्या गोटात खळबळ उडवण्याचा प्रयत्न केला. वडेट्टीवारांनी शिवसेनेमध्ये नवा उदय होणार असल्याचं म्हटलं. तर संजय राऊतांनी थेट उदय सामंतांचं पूर्ण नाव घेत त्यांच्याकडे 20 आमदार असल्याचा दावा केला. म्हणजेच शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये उदय सामंतांच्या माध्यमातून फूट पडणार असं भाकीत वर्तवून वडेट्टीवार आणि राऊतांनी राजकीय भूकंपाचे संकेत दिले. आता वडेट्टीवार आणि राऊतांनी उदय सामंतांकडे मोर्चा का वळवला तर शिंदे यांच्या नाराजीच्या चर्चा रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावरून गोगावले आणि दादा भुसे यांचा पत्ता कट झाल्यामुळे शिंदे नाराज होऊन साताराच्या दरेगावी गेल्याची चर्चा होती. पण आपण नाराज नसून शिंदेनी गोगावले यांच्या उघड नाराजीचं समर्थनही केलं. त्याच वेळी मुख्यमंत्री दाऊस दौर्‍यावरून आल्यावर मार्ग काढू असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले. रायगडचा पालकमंत्री पद राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे यांना गेल्यामुळे गोगावलेसह शिवसैनिकांनी विरोध केलाय. तर नाशिकचा पालकमंत्री पद गिरीश महाजन यांना देऊन दादा भुसे यांचा पत्ता कट झाला. पण उघडपणे आवाज उठवल्यानंतर दाऊसवरून मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली आहे. मात्र संजय राऊतांनी दरेगावी जाण्यावरून टीका करणं सोडलं नाही. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Jan 20, 2025 10:46 PM