विजय वटेट्टीवार यांच्या ‘त्या’ टीकेला मंत्री गुलाबराव पाटील यांचा टोला; म्हणाले, ‘ते’ कारण काढणं दुर्दैवी

विजय वटेट्टीवार यांच्या ‘त्या’ टीकेला मंत्री गुलाबराव पाटील यांचा टोला; म्हणाले, ‘ते’ कारण काढणं दुर्दैवी

aslam shanedivan | Updated on: Aug 15, 2023 | 7:58 AM

याबाबत काँग्रेस नेते बोलत असून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद धोक्यात असून ते जातील तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्री केलं जाईल असं म्हणताना दिसत आहेत.

जळगाव, 15 ऑगस्ट 2023 | गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेचे वारे राज्यात वाहू लागले आहेत. याबाबत काँग्रेस नेते बोलत असून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद धोक्यात असून ते जातील तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्री केलं जाईल असं म्हणताना दिसत आहेत. तर आत्ताही काँग्रेस नेते विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी, मुख्यमंत्री शिंदे यांच्या आजारपणाचे कारण समोर करून त्यांचा राजीनामा घेतला जाईल व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्री केलं जाईल, असं वडेट्टीवार यांनी म्हटलं होतं. त्यावर शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी टोला लगावला आहे. तर मुख्यमंत्री शिंदे हे आजारी आहेत, मी आजच त्याबाबत माहिती घेतली आहे, मात्र त्यांच्या आजारपणाचे कारण काढणे चुकीचं आहे असं ते म्हणालेत. तसेच मुख्यमंत्र्यांबाबत मी त्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांच्याकडून फोनवरून माहिती घेतली. आजारपणामुळे ते खरोखर येऊ शकले नाहीत. मात्र त्यांच्या आजाराचं कारण काढणं ही दुर्दैवी बाब आहे. वडेट्टीवार यांच्या म्हणण्याला काही तथ्य नाही असे म्हणत गुलाबराव पाटील यांनी वडेट्टीवार यांनी टोला लगावला आहे.

Published on: Aug 15, 2023 7:58 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us