Gulabrao Patil | विधान परिषदेसाठी रस्सीखेच; गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना; मोठं काहीतरी घडणार?

Gulabrao Patil | विधान परिषदेसाठी रस्सीखेच; गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना; मोठं काहीतरी घडणार?

| Updated on: May 30, 2026 | 4:48 PM

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विधान परिषदेच्या 17 जागांसाठी लवकरच निवडणूक होणार असून महायुतीत जागावाटपावरून अद्यापही एकमत झालेलं नाही. ही निवडणूक महायुती एकत्रितपणे लढवणार असली तरी काही जागांवर भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील मतभेद कायम असल्याचे दिसत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपचे संख्याबळ अधिक असल्याने पक्षाकडून जास्त जागांची मागणी करण्यात येत आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विधान परिषदेच्या 17 जागांसाठी लवकरच निवडणूक होणार असून महायुतीत जागावाटपावरून अद्यापही एकमत झालेलं नाही. ही निवडणूक महायुती एकत्रितपणे लढवणार असली तरी काही जागांवर भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील मतभेद कायम असल्याचे दिसत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपचे संख्याबळ अधिक असल्याने पक्षाकडून जास्त जागांची मागणी करण्यात येत आहे. दुसरीकडे शिवसेना शिंदे गट सहा जागांवर ठाम असून भाजप चार जागा सोडण्यास तयार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे जागावाटपाचा तिढा अद्याप कायम आहे.
दरम्यान, जळगाव विधान परिषद मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीत मोठी रस्सीखेच सुरू झाली आहे. ही जागा भाजपला जाण्याची शक्यता वर्तवल्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील तातडीने जळगावहून मुंबईकडे रवाना झाले आहेत. जळगावची जागा शिवसेनेला मिळावी यासाठी ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. जळगाव विधान परिषदेसाठी मंत्री गुलाबराव पाटील यांचे पुत्र प्रतापराव पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू असून त्यांनी उमेदवारी अर्जही घेतला आहे. यापूर्वी जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेच्या आमदारांच्या शिष्टमंडळाने एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन ही जागा शिवसेनेला द्यावी किंवा मैत्रीपूर्ण लढतीस परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती.
दरम्यान, महायुतीत जागावाटपाचा तिढा कायम असतानाच सोलापूरमधून शिवसेना शिंदे गटाचे नेते रमेश बारसकर यांनी विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तसेच सोलापुरात शिवसेनेला विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
उद्या सायंकाळपर्यंत जळगावसह अन्य जागांबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Published on: May 30, 2026 4:48 PM
Follow Us