Gunaratna Sadavarte Video : ‘आरोपींना पळून जाण्यासाठी धसांच्या पत्नीनं 3 लाख…’, गुणरत्न सदावर्तेंचा गंभीर आरोप काय?
भटक्या विमुक्त समाजातील आदिवासी मागास समाजातील बुट्ट्या गायकवाड यांचा जो खून झाला, हे प्रकरण बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणापेक्षा देखील गंभीर असल्याचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे. तर यावेळी त्यांनी भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर सडकून टीका केली. ‘बुट्ट्या गायकवाड प्रकरणात सुरेश धस यांना अटक करा’, अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. तर […]
भटक्या विमुक्त समाजातील आदिवासी मागास समाजातील बुट्ट्या गायकवाड यांचा जो खून झाला, हे प्रकरण बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणापेक्षा देखील गंभीर असल्याचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे. तर यावेळी त्यांनी भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर सडकून टीका केली. ‘बुट्ट्या गायकवाड प्रकरणात सुरेश धस यांना अटक करा’, अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. तर हत्या प्रकरणातील शस्त्र सुरेश धस यांच्या शेतात सापडली होती का? असा सवालही गुणरत्न सादवर्ते यांनी केलाय. इतकंच नाहीतर आरोपींना पळून जाण्यासाठी सुरेश धस यांच्या पत्नीने तीन लाख रूपये दिले होते का? असं म्हणत गुणरत्न सदावर्ते यांनी हल्लाबोल केलाय. दरम्यान, केंद्र हे तपासातील अधिकारी ते मेन विटनेस आहेत. ते डंके की चोट पे सांगत आहेत धस यांना आज देशमुख प्रकरणावर बोलण्यासाठी तोंड राहिलेले नाही. धस कोण आहेत हे मराठा समाजाचे आहेत. उच्च जातीचे आहेत. ते तत्कालीन मंत्री होते हे काहीही मायने राखत नाही. त्यांच्या कुटुंबाचे इन्व्हॉलमेंट गायकवाड मर्डर केसमध्ये असेल तर बाबतीत पूर्णपणे छडा लागला पाहिजे, असेही सदावर्ते म्हणाले. ‘पोलीस अधिकारी केंद्रे यांचे स्टेटमेंट रेकॉर्ड करून पुन्हा तपास पुढे घेऊन गेला पाहिजे. सुरेश धस यांच्या पत्नीने आरोपीला तीन लाख रुपये केसमधून काढता पाय घेण्यासाठी दिले असतील, हत्यारे धसांच्या शेतातून जप्त केले असतील’, असा गंभीर आरोपही सदावर्ते यांनी केला आहे.

खोक्याचं पोलिस कोठडीत अन्नत्याग आंदोलन, केली ही मोठी मागणी

'...एकतर तो पुरूष नाहीच', नाव न घेता सुप्रिया सुळेंची मुंडेंवर टीका

बीडमधील शिक्षकाच्या आत्महत्येला सरकार जबाबदार; अंबादास दानवेंचा आरोप

शिवरायांचं एकमेव मंदिर भिवंडीत, 4 एकरवर उभारलं भव्य देऊळ,नेमकं खास काय
