Gunaratna Sadavarte : ठाकरे बंधूंकडून शैक्षणिक हत्या हा तांडव मेळावा, या दोघांचे गळे धरल्याशिवाय… गुणरत्न सदावर्तेंचा संताप
गुणरत्न सदावर्ते यांनी हिंदी भाषा आदेश रद्द झाल्यानंतर ठाकरे बंधूंच्या विजय मेळाव्यावरून तीव्र टीका केली आहे. त्यांनी हा मेळावा शैक्षणिक हत्या म्हणून संबोधित केला आहे आणि ठाकरे बंधूंना त्यांच्या स्वतःच्या मुलांच्या शिक्षणाबाबत प्रश्न विचारले आहेत. मनसे कार्यकर्त्यांनी सदावर्ते यांच्या घराबाहेर जल्लोष साजरा केल्यानंतर हा वाद निर्माण झाला आहे.
सरकारने जीआर रद्द केल्यानंतर ठाकरे बंधूंकडून करण्यात येणाऱ्या विजयी मेळाव्यावरून गुणरत्न सदावर्ते यांनी हल्लाबोल केला आहे. कष्टकऱ्यांच्या लेकरांच्या शिक्षणावर राज ठाकरे उठलेत अशा भाषेत सदावर्ते यांनी टीका केली आहे. मराठी हिंदीच्या मुद्द्यासंदर्भात जीआर रद्द केल्यानंतर सदावर्ते यांच्या घराबाहेर मनसेकडून जल्लोष साजरा करण्यात आला होता. यानंतर मराठी आणि हिंदीच्या मुद्द्यावरून हिंदीच्या बाजूने बोलणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांनी दोन्ही ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.
महायुती सरकारने हिंदीच्या मुद्द्यावरचा जीआर रद्द केला त्यानंतर पाच जुलैला मोर्चा नाही तर विजय मेळावा काढणार असं दोन्ही ठाकरे बंधूंकडून जाहीर करण्यात आला आहे. त्यावरूनच आता सदावर्ते यांनी दोन्ही ठाकरे बंधूंवर निशाणा साधला आहे. इतकंच नाहीतर येणाऱ्या काळात तुमचा गळा धरल्याशिवाय पालक राहणार नाहीत असं म्हणत सदावर्ते यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. स्वतःच्या मुलाच्या चिंतेतून दोन्ही ठाकरे नवा प्रयोग करून महाराष्ट्राला वेठीस धरण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका ही गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे.

ना हनी, ना ट्रॅप..; हनीट्रॅपवर मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया

सगळे आमदार माजले... फडणवीसांनी भर सभागृहात कोणाला फटकारलं?

बदनापूर तालुक्यात अतिवृष्टी सदृश्य पाऊस; शेतांना आलं तळ्याचे स्वरूप

मुलीला गलिच्छ शिव्या, आव्हाडांच्या पत्नीनं सांगितलं संपूर्ण प्रकरण
