Manoj Jarange Patil : जरांगे मोठा नाही, त्याचे लाड बंद करा अन् त्याला… सदावर्तेंच्या विधानाने खळबळ, पवारांवरही साधला निशाणा
'गुन्हारीच्या केसेस मागे घेण्याची मागणी जरांगेंनी केली आहे. अशा केसेस मागे घेण्यावर सर्वोच्च न्यायलयाने बंधन घातेलेले आहे. पोलिसांच्या वर्दीला हात लावलेला आहे, त्यांच्या डोक्यातून रक्त वाहत आहे. त्यामुळे या केसेस मागे घेऊ नका', सदावर्तेंची मागणी
मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाची आज वाढून दिलेली मुदत संपणार आहे. अशातच आज निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली. यावेळी जरांगेंनी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची विनंती केली. इतकंच नाहीतर मराठा आणि कुणबी एक असल्याचे घोषित करा, अशी मागणी केली. यासंदर्भात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन आणि त्यांच्या मागण्यांवर बोलताना सदावर्ते यांनी थेट त्यांच्या अटकेची मागणी केली.
‘कायद्यासमोर जरांगेला मोठं समजू नये. आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जरांगे ऐकला नाही तर चुकीची प्रथा पडेल. नियम मोडले जातील. यामुळे आगामी काळातील आंदोलनांमध्येही नियम मोडण्याची प्रथा पडेल. हे कायद्याचं राज्य आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काय म्हणातात यापेक्षा कायदा काय म्हणतो हे पाहून, वरिष्ठ पोलिस निरिक्षण आझाद मैदान यांनी सहा वाजल्यानंतर जरांगेला अटक करून, माननीय मॅजिस्टेट यांच्यासमोर उभे करा’, असं सदावर्ते म्हणाले. तर यावेळी बोलत असताना शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला. शरद पवार हे आरक्षणावरून फसवा-फसवी करत असल्याचे सदावर्ते म्हणाले.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

