Gunaratna Sadavarte : ‘हे कायद्याचं राज्य, कुणाच्या बापाची….’, सदावर्तेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
महाराष्ट्रात पहिलीपासूनच शालेय अभ्यासक्रमात हिंदी भाषेची सक्ती करण्यात आली आहे. यावरून मनसे आणि राज ठाकरे यांनी विरोधी भूमिका घेत थेट टोकाचा इशारा दिला आहे. अशातच गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरेंविरोधात तक्रार दाखल करणार असल्याचे म्हटलंय.
वकील गुणरत्न सदावर्ते हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात तक्रार दाखल करणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज पार्क पोलीस ठाण्यात सदावर्ते राज ठाकरेंच्या विरोधात तक्रार करणार असल्याची माहिती समोर आली आहे. हिंदी सक्तीविरोधात राज ठाकरे आक्रमक झाले आहेत. यावरूनच सदावर्तेंनी ही भूमिका घेतली आहे. यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, ‘राज ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी गुंडागिरीची भाषा केली. संविधानाच्या मार्गाने आम्ही तक्रार दाखल करायला जातोय. कोणत्याही प्रकारे शिक्षणाची दारं बंद करता येत नाही. मात्र मनसेची लोकं हिंदी भाषेला नको म्हणत शिक्षणाच्या बाबतीत धमकावत आहेत. म्हणून आम्ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करायला जातोय’, असं सदावर्ते म्हणाले. एखाद्या शासनाच्या निर्णयाची होळी करणं हे बेकायदेशीर आहे. बेकायदेशीरपणे एकत्र जमाव जमवून कार्यकर्त्यांनी फेक्स लावले हा गुन्हा आहे त्यामुळे राज ठाकरेंना नोटीस द्यायला हवी, हे कायद्याचं राज्य आहे कोणाच्या बापाच्या घरची शेती नाही, असं म्हणत सदावर्ते यांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केलाय.
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?
भाजपच्या अमित साटम यांच्याकडून बूटपॉलिश, 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल
मुंबईत साड्या पेटवल्या मुंबईत राडा,आचारसंहितेचा भंग, शिंदे सेनेवर आरोप

