Gunratan Sadavarte : ठाकरे बंधूंचं राजकारण दळभद्री; 5 जुलैची नोंद काळ्याकुट्ट अक्षरात होईल, सदावर्तेंची आगपाखड
Gunratan Sadavarte PC : वकील गुणरत्न सदावर्ते यांनी ठाकरे बंधूंवर टीका करत चांगलंच धारेवर धरलं आहे.
तुम्ही जो काही उत्सव साजरा करणार आहात पण हा उत्सव म्हणजे शैक्षणिक हत्या करून तांडव करायला निघाला आहात त्या बाबीचा गंभीर निषेध करतो. जो उत्सव साजरा करण्यात येणार आहे तो दिवस काळ्याकुट्ट अक्षरात नोंद होईल, यही घणाघाती टीका करत गुणरत्न सदावर्ते यांनी ठाकरे बंधूंवर आग पाखड केली आहे. हिंदी सक्तीच्या जीआर रद्द केल्याच्या निर्णयानंतर सदावर्ते यांनी पत्रकार परिषद घेत ही टीका केली.
यावेळी बोलताना सदावर्ते म्हणाले की, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे राजकारण दळभद्री आहे. गल्लीच्या निवडणुकांसाठी हे सगळं सुरू आहे. राज ठाकरे यांची वळवळ फार टिकणारी नाही. राज ठाकरे यांच्या रोगाला कुठेतरी थांबवावं. मराठीला खतरा आहे अस सांगत ही सरकारची गळचेपी केली. वातावरण गढूळ होऊ नये म्हणून सरकारने शासन निर्णय रद्द करत आहोत असं सांगितलं. माझ्या घराच्या समोर येऊन कार्यकर्त्यांनी धिंगाणा केला. तुम्हाला गचंडीला धरून लोक तुम्हाला हिशोब विचारणार. याची जाणीव राज आणि उद्धव ठाकरे यांना होईल, अशीही घणाघाती टीका सदावर्ते यांनी केली आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

