आमच्या जीवाला धोका, गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नीचा गंभीर आरोप
सदावर्ते यांच्या जीविताला काही झालं तर त्याला शरद पवार, दिलीप वळसे पाटील आणि सुप्रिया सुळे जबाबदार असतील असा आरोपही त्यांनी केलाय. आम्ही पवारांविरोधात सातत्याने बोललो, त्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढली, त्यामुळेच सदावर्तेंना ताब्यात घेण्यात आल्याचा आरोप जयश्री पाटील यांनी केलाय.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी धडक दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसंच पवारांच्या निवासस्थानावर चपला आणि दगडफेकही करण्यात आली. या संपूर्ण प्रकारामागे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा हात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येतोय. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्री 8 वाजता गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सदावर्ते यांच्या राहत्या घरातून त्यांनाा ताब्यात घेऊन गावदेवी पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. दरम्यान, पोलिसांनी जबरदस्ती केल्याचा आरोप सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी केलाय.
सदावर्ते यांच्या जीविताला काही झालं तर त्याला शरद पवार, दिलीप वळसे पाटील आणि सुप्रिया सुळे जबाबदार असतील असा आरोपही त्यांनी केलाय. आम्ही पवारांविरोधात सातत्याने बोललो, त्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढली, त्यामुळेच सदावर्तेंना ताब्यात घेण्यात आल्याचा आरोप जयश्री पाटील यांनी केलाय.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला