Gyanvapi Masjid Case: वजूखान्यातच शिवलिंग सापडल्याचा हिंदू पक्षाचा दावा
कोर्टाच्या आदेशानंतर अखेर ज्ञानवापी मशिदीतील वजूखाना बंद करण्यात आला आहे. नऊ टाळे लावून वजूखाना सील करण्यात आला आहे. तसेच या परिसराच्या सुरक्षेची जबाबदारी सीआरपीएफकडे (crpf) देण्यात आली आहे.
कोर्टाच्या आदेशानंतर अखेर ज्ञानवापी मशिदीतील वजूखाना बंद करण्यात आला आहे. नऊ टाळे लावून वजूखाना सील करण्यात आला आहे. तसेच या परिसराच्या सुरक्षेची जबाबदारी सीआरपीएफकडे (crpf) देण्यात आली आहे. तर, दुसरीकडे वाराणासीतील (Varanasi) सरकारी वकिलांनी आज आणि 20 मे रोजी संप पुकारला आहे. त्यामुळे आज ज्ञानवापी प्रकरणावर वाराणासी कोर्टात सुनावणी होणार नाही. दरम्यान, मशिदीच्या वजूखान्याशी संबंधित एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा दुसरा व्हिडिओ जुना असल्याचं सांगितलं जात आहे. आतापर्यंत या मशिदीशी संबंधित दोन व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. दोन्ही व्हिडीओ एक दोन महिने जुने असल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे. मात्र, वजूखान्यात सापडलेली दगडाची आकृती शिवलिंग आहे की फव्वारा आहे याचं रहस्य अद्यापही गुलदस्त्यात आहे.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट

