Pahalgam Terror Attack : दहशतवादी हाफिज सईद घाबरला
दहशतवादी हाफिज सईद हा आयएसआयच्या लष्करी छावणीत घाबरून लपला असल्याचं वृत्त समोर आलं आहे.
ISI ने लष्करी छावणीमध्ये हाफिज सईदला लपवलं आहे. ISIच्या सेफ हाऊसमध्ये हाफिज सईद लपला असल्याची माहिती समोर आली आहे. पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या विरोधात काही कठोर निर्णय घेतले आहेत. यानंतर आता हाफिज सईदचा एक जुना व्हिडिओ सध्या व्हायरल होतं आहे. यात हाफिज सईद हा ‘तुम्ही आमचं पाणी थांबवाल तर आम्ही तुमचा श्वास थांबवू’ असं वादग्रस्त विधान केलेलं आहे. त्यानंतरच आता हाफिज सईदला ISI ने आपल्या सेफ हाऊस अर्थात लष्करी छावणीमध्ये लपवून ठेवलं असल्याचं सांगण्यात येत आहे.
Published on: Apr 25, 2025 01:35 PM
Latest Videos
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

