मोठी राजकीय घडामोड! हसन मुश्रीफांचा संजय मंडलिकांना पुन्हा मैत्रीचा हात; कोल्हापुरात नवी राजकीय समीकरणं?
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना पुन्हा वेग आला असून, कोल्हापूरमध्ये महायुतीतील समन्वय आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी अशा दोन महत्त्वाच्या घडामोडी समोर आल्या आहेत.
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना पुन्हा वेग आला असून, कोल्हापूरमध्ये महायुतीतील समन्वय आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी अशा दोन महत्त्वाच्या घडामोडी समोर आल्या आहेत.
कोल्हापूरमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांनी शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार संजय मंडलिक यांच्याकडे पुन्हा मैत्रीचा हात पुढे केल्याचे पाहायला मिळाले. कागल येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना हसन मुश्रीफ यांनी गोकुळ दूध संघ आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढवाव्या लागतील, असे वक्तव्य केले. तसेच कागलमधील चारही राजकीय गट एकत्र आल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही काही अंतर्गत घडामोडी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त लावण्यात येणाऱ्या बॅनर्सबाबत पक्षाने काही विशिष्ट सूचना दिल्याचे समोर आले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, सर्व बॅनर्सवर अजित पवार यांचाच एकाच प्रकारचा अधिकृत फोटो वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच बॅनर लावल्यानंतर त्याचे जिओ-टॅगिंग करण्याचेही निर्देश पक्षाकडून देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या निर्णयामुळे पक्षातील काही आमदारांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.
दरम्यान, या दोन्ही घडामोडींवर संबंधित नेत्यांकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नसून, आगामी राजकीय निर्णयांकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Published on: Jul 16, 2026 10:37 AM
हसन मुश्रीफांचा संजय मंडलिकांना पुन्हा मैत्रीचा हात; कोल्हापुरात नवी..
फडणवीस-तटकरे भेटीची सुनेत्रा पवारांना कल्पनाच नव्हती?
नाशिकचे खासदार एकनिष्ठ राहिले, मात्र... ठाकरेंच्या नगरसेवकांबाबत मोठी
मोठी बातमी! शिंदे गटाकडून अटोकाट प्रयत्न, पण ऐनवेळी ऑपरेशन टायगरला खो,

