Headlines | हेडलाईन्स | 10 PM | 10 January 2022

कोरोना रुग्णसंख्येत महाराष्टाला काहीसा दिलासा मिळाला आहे. कारण राज्यातला कोरोना रुग्णांचा आकडा काहीसा घटला आहे. राज्यात आज 33 हजार 470 नवे रुग्ण आढळून आलेत काल हा आकडा 44 हजारांच्या पुढे पोहोचला होता. दिवसभरात 8 रुग्णांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. तर 29 हजार 671 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

एकट्या मुंबईतला कोरोना रुग्णांचा आकडा 20 हजारांच्या पुढे पोहोचला होता, त्यामुळे मुंबईचेही धाबे दणाणले होते, मात्र आज सलग दुसऱ्या दिवशी मुंबईतील रुग्णसंख्येत घट होत असल्याचे आढळून आले आहे. काल ही घट कमी होती मात्र ही घट आणखी जास्त वाढली आहे. आज मुंबईत 13 हजार 648 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 27 हजारांच्या पुढे रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर पुण्यातला कोरोना रुग्णांचा आकडाही काहीसा घटला आहे. काल पुण्याच चार हजारांच्या पुढे रुग्ण आढळून आले होते, तोच आकडा आज तीन हजारांवर आला आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI