AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यातच रूग्णांचे हाल; परिचारिकांची 458 पदे मंजूर असताना भरली फक्त 4

वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यातच रूग्णांचे हाल; परिचारिकांची 458 पदे मंजूर असताना भरली फक्त 4

| Updated on: Jun 15, 2023 | 4:40 PM
Share

अनेक ठिकाणी फक्त परिचारिकांची संख्या कमी असल्याने रूग्णालय प्रशासनावर ताण आलेला पाहण्यात आलेलं आहे. तर अनेक वेळा परिचारिकांनी जेव्हा जेव्हा आंदोलन केले तेव्हा जागा भरण्याची मागणी केली आहे. मात्र त्या कुठे पुर्ण होतात तर कुठे नाही. तर कुठे बदलींमुळे रूग्णालयाचे प्रश्न वाढण्यासह रूग्णांचे हाल होतात.

जळगाव : राज्याच्या अरोग्य विभागाची दारोमदार ही जेवढी डॉक्टरांवर अवलंबून असते तितकीच ती परिचारिकांच्यावरही. त्यामुळेच डॉक्टरांपैक्षा परिचारिकांच्या संख्येवर अरोग्यविभाग विशेष लक्ष देत असतं. मात्र अनेक ठिकाणी फक्त परिचारिकांची संख्या कमी असल्याने रूग्णालय प्रशासनावर ताण आलेला पाहण्यात आलेलं आहे. तर अनेक वेळा परिचारिकांनी जेव्हा जेव्हा आंदोलन केले तेव्हा जागा भरण्याची मागणी केली आहे. मात्र त्या कुठे पुर्ण होतात तर कुठे नाही. तर कुठे बदलींमुळे रूग्णालयाचे प्रश्न वाढण्यासह रूग्णांचे हाल होतात. सध्या अशीच स्थिती ही जळगावमध्ये समोर येत आहे. जळगाव हा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांचा असूनही तेथे परिचारिकांच्या कमी संख्येमुळे जिल्ह्याचेच आरोग्य बिघडल्याचे समोर येत आहे.

येथे राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने काढलेल्या परिचारिकांच्या बदल्यांमुळे थेट परिणाम झाले आहेत. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात परिचारिकांची 458 पदे मंजूर असताना फक्त 4 पदे भरण्यात आली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील वर्ग केलेल्या 68 व जीएमसीच्या 4 अशा 72 परिचारिकांवरच काम सुरू होते. मात्र आरोग्य विभागाने 44 परिचारिकांच्या बदल्या केल्याने 350 बेड असलेल्या रुग्णालयाचा भार आता 28 परिचारिकांवर पडलाय. एका आयसीयू विभागात किमान 15 परिचारिकांची अशी जीएमसीत तीन आयसीयूत 45 परिचारिकांची गरज असताना संपूर्ण रुग्णालयासाठी 28 म्हणजेच 6 टक्के परिचारिकाच काम करत आहेत. त्यामुळे रुग्णालयात अडचणी ‍निर्माण झाल्या आहेत

Published on: Jun 15, 2023 04:40 PM