ठाकरे गटाला पक्षाची संपत्ती मिळणार की नाही? सुप्रीम कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
VIDEO | शिवसेना पक्षाच्या मालमत्तेबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, ठाकरे गटाला पक्षाची संपत्ती मिळणार की नाही? काय झाला निर्णय?
नवीदिल्ली : शिवसेना पक्षाच्या मालमत्तेबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होती. या सुनावणीमध्ये ठाकरे गटाला पक्षाची संपत्ती द्यायची की नाही? यावर निर्णय घेण्यात येणार होता. ठाकरे गटाची संपत्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याबाबतच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होती. शिवसेना भवनासह पक्षाचा निधी आणि इतर शिवसेना शाखांचा ताबा शिंदे गटाला देण्याबाबत ही याचिका दाखल केली गेली होती. ही याचिका एका वकिलाकडून दाखल करण्यात आली होती. या याचिकेशी शिंदे गटाचा काहीही संबंध नव्हता. सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळून लावल्याने याचिका करणाऱ्या वकिलालाही सुप्रीम कोर्टाने फटकारल्याचे समोर आले आहे. तर संपत्ती शिंदेंना द्यावी अशी मागणी करणारे तुम्ही कोण? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्या वकिलाला केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. कोर्टाने शिंदे यांची याचिका फेटाळून लावल्याने शिवसेना भवन, शिवसेनेच्या शाखांचा ताबा ठाकरे गटाकडेच राहणार आहे. तसेच शिवसेनेचा निधीही ठाकरे गटाकडेच राहणार आहे.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

