Video | पुण्यात धो धो धो…मान्सूनपूर्व पावसाने झोडपलं; सगळीकडे बरसल्या सरी!

Video | पुण्यात धो धो धो…मान्सूनपूर्व पावसाने झोडपलं; सगळीकडे बरसल्या सरी!

| Updated on: May 22, 2026 | 5:57 PM

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात गुरुवारी सायंकाळी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. दुपारनंतर वातावरणात बदल जाणवत होता. काळे ढग दाटून आल्यानंतर विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू झाला. काही भागात वादळी वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या रस्त्यावर पडल्याच्या घटना घडल्या.

भोर शहरासह ग्रामीण भागात सुमारे 1 तास जोरदार पाऊस पडला. या पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक शेतकऱ्यांनी या पावसामुळे खरीप हंगामाच्या तयारीला गती मिळणार असल्याचे सांगितले. काही ठिकाणी वीजपुरवठाही काही काळ खंडित झाला होता.

दरम्यान, शहरातील काही ठिकामी गटार तुंबल्याने पाणी साचलं होतं. नागरिकांनी वादळी वाऱ्याच्या काळात सुरक्षित ठिकाणी राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पावसामुळे परिसरातील वातावरणही गारठले असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले

Published on: May 22, 2026 5:57 PM
Follow Us