.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Navi Mumbai Rain | APMC मार्केटमध्ये पाणीच पाणी, पहाटेपासून मुसळधार पावसाचा कहर; वाहतूक विस्कळीत

Navi Mumbai Rain | APMC मार्केटमध्ये पाणीच पाणी, पहाटेपासून मुसळधार पावसाचा कहर; वाहतूक विस्कळीत

| Updated on: Jun 30, 2026 | 10:15 AM
Share

नवी मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. संपूर्ण शहरात पावसाचा जोर कायम आहे. पहाटेपासून सुरू झालेल्या या पावसामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

विशेषतः APMC मार्केट परिसरात मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी साचले असून त्यामुळे व्यापारी आणि वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पाणी साचल्यामुळे रस्त्यांवरून वाहन चालवणे कठीण झाले असून अनेक वाहनधारकांना पाण्यातून वाहन बाहेर काढताना मोठी कसरत करावी लागली.

पावसाचा जोर सकाळपासूनच कायम असल्याने नवी मुंबईतील दैनंदिन जनजीवनावर परिणाम झाला आहे. कार्यालयीन वेळेत प्रवास करणाऱ्या नागरिकांनाही वाहतुकीच्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. काही ठिकाणी वाहतूक संथ गतीने सुरू असल्याचेही दिसून येत आहे.

नवी मुंबईसह आसपासच्या भागांमध्येही पावसाची संततधार सुरू असल्याने हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील काही तासांतही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रशासनाकडून पाणी निचरा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.

दरम्यान, नागरिकांनी गरज नसताना घराबाहेर पडू नये, तसेच पाणी साचलेल्या भागांपासून दूर राहावे, असे आवाहनही करण्यात येत आहे.

Published on: Jun 30, 2026 10:15 AM

Follow Us