Cyclone Alert | राज्यात गुलाब चक्रीवादळाचा धुमशान, 12 जिल्ह्यांना यलो अलर्ट

द्या उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात प्रभाव राहील, असा अंदाज आहे. बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यांना यलो अलर्ट आहे.

मुंबई : गुलाब चक्रीवादळामुळे (Gulab cyclone ) मराठवाडा (Marathwada rain) आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचं (Rain in Maharashtra) धुमशान पाहायला मिळत आहे. मराठवाड्यात कालपासून तुफान पाऊस बरसत आहे. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. गुलाब चक्रीवादळामुळे कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. त्याचा प्रभाव पुढील 48 तास राज्यावर पाहायला मिळणार आहे. इकडे मुंबईसह ठाणे आणि उपनगरात जोरदार पाऊस बरसत आहे. येत्या 24 तासात, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार आणि अतीवृष्टीची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, विदर्भात पावसाचा प्रभाव कमी जाणवेल. तर उद्या उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात प्रभाव राहील, असा अंदाज आहे. बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यांना यलो अलर्ट आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI