CM Devendra Fadnavis : हिंदी संपर्कसूत्राची भाषा आहे, त्यामुळे..; हिंदी भाषेच्या सक्तीवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया
Fadnavis Reaction On Hindi Language : आता पहिलीपासूनच इंग्रजीबरोबर हिंदी भाषा ही सक्तीची करण्यात आलेली आहे. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आता पहिलीपासूनच इंग्रजीबरोबर हिंदी भाषा ही सक्तीची करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणाची यंदापासूनच टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी होणार आहे. शाळांमध्ये आता पहिलीपासूनच मराठी आणि इंग्रजीबरोबरच हिंदी भाषा देखील सक्तीची असणार आहे. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना म्हंटलं की, नवीन शिक्षण नीति ही या पूर्वीच आपण लागू केलेली आहे. त्यात कोणताही नवीन बदल आणि निर्णय आपण केलेला नाही. महाराष्ट्रात मराठी प्रत्येकाला आलंच पाहिजे, हा आपला आग्रह आहे. त्याचसोबत देशात एक संपर्क सूत्र तयार करण्यासाठी हिंदी ही एक भाषा आहे, त्यामुळे हिंदी देखील शिकली पाहिजे असा हा प्रयत्न आहे, असं फडणवीस यांनी सांगितलं.
Published on: Apr 17, 2025 04:49 PM
Latest Videos

ज्योती मल्होत्राची मोठी कबुली, जबाबात म्हणाली पाकच्या सुचनेनुसार....

मुंडेंना घेऊन अजितदादा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; काय झाली चर्चा?

नाशिकमध्ये अवकाळीचा कहर; भाजीपाला सडला, शेतकरी हवालदिल

हेच ते बंकर, जमिनीपासून 15 फूट खोल, जिथून भारतीय सैन्याची शत्रूवर नजर
